Posts

श्रीराम जन्मोत्सव २०२४

श्रीराम जन्मोत्सव - २०२४ जन्मभूमीच्या भव्य महाली  नीरव शांतता भंग जाहली देवी कौसल्या प्रसूत झाली  आज अयोध्या सजली नटली....१ भर माध्यान्ही चैत्र नवमीला कौसल्येचा पुत्र म्हणोनी जन्म घेतला पृथ्वीतलावर श्रीविष्णूंचा अवतार म्हणोनी.....२ जन्म सोहळा तुझा अनोखा आम्ही केवळ श्रवण करावा करी कौतुक प्रजाजन बघुनी डोळे मिटून घे तव जननी.....३ तुझा पाळणा नित्य सजवूनी  झुलवी माता तिन्ही रंगुनी क्षण दशरथा अति भाग्याचा मान लाभला देव पित्याचा.....४ जन्मताच तू प्रेम लुटावे त्यात नित्य आकंठ बुडावे डावा उजवा तुझ्यात नसतो अंजनीसुत तुज हृदयी वसतो.....५ आजानुबाहू तुझे सावळे रूप पाहता दिव्य कोवळे कमलनयन अतिसुंदर डोळे अवघे त्रिभुवन तुजवर भाळे.....६ सत्यवचनी केवळ रघुकुल सूर्यवंशी तू दशरथ नंदन भ्राता त्रय तुज प्रेमे बघती करती तुजला त्रिवार वंदन.....७ गुरू आज्ञेने राक्षस वधीले यज्ञयाग ते निर्विघ्न जाहले मुक्त करुनी शिळा अहिल्या मुनी जन करती वंदन तुजला.....८ स्वयंवरा त्या जनकपुरीला शूर पुरुष ते सिद्ध सभेला उचलून घेई शिवधनुष्याला दिसे न कोणी त्या जनकाला.....९ अनुज्ञा मागुनी श्री जनकाला चरणस्पर्श मग करुन ग...

इस्रो स्तवन

मोहीम आखून नेमकी ठरवली इस्रोनी त्याची खरी भिडले त्वरी सगळे कठिण जी होती महा ती खरी कार्याला वाहून पूर्ण दिवस जे स्वप्नास ज्या पाहती वैज्ञानिक लागले अनवरत त्या पूर्णत्व देण्या किती....१ मेधा तल्लख शुद्ध-बुद्धी वसते अंगी जयांच्या कशी अभ्यासोनी नित्य तीच झळके डोळा तयांच्या तशी रात्रीचा दिन तो करून म्हणती माघार नाही मुळी घेण्या झेप नभी सुसज्ज करती यानास सिद्ध वेळी...२ मोहीम मागची कशी अपयशी झाली असे त्या दिनी त्यावर उत्तर शोधणे सतत ही शास्त्रज्ञ दैनंदिनी सत्वर ठोस पावले उचलुनी येती निष्कर्षाप्रती उणीवा दूर करून सगळ्या देती जगा खात्री ती ...३ आता मात्र भरारी घेत करूया यानास प्रक्षेपित आश्वासन देत नित्य म्हणती येतो वसुंधरेचे सुत देशाचा ध्वज हा तिरंगी तुजला देईल तो विक्रम इस्रोतील भगिनी बंधू करती अद्भुत हा पराक्रम...४ दिन ते चाळीस पूर्ण करून घडली ही प्रदक्षिणा यानाचे सहजी तिथे उतरणे संकल्प हा त्या क्षणा संचालन गतीचे मिळून करती इस्रोमधूनी श्रमी रोवूनी पद अंगदासमान तिथल्या भूमीवरी विक्रमी...५ देशाचा अभिमान बावनकशी शास्त्रज्ञ ते दर्शती कार्याला करण्या यशस्वी हवी जी एकाग्रता दर्शती वृत्तीचे दिसते ...

आभाळ माया

क्षितिजाच्या पलिकडले, आभाळ ठेंगणे दिसले हात लागू दे आभाळाला, सहज असे वाटले.... उंची वाढता प्रभाव पडतो, असे वाटते कुणा परंतु भूमीकडे पाहता, मिटती पाऊलखुणा.... पावलांची चाहूल येता, कुणी येतसे अपुल्या वाटे येणाऱ्याचे स्वागत होते, स्वभाव सांगे खरे की खोटे... स्वभावाला औषध नाही, असे कुणी का बरे म्हणाले व्याधींवरल्या यादीमध्ये, स्वभावालाही जोड म्हणाले....  गुणदोषांसह माणूस जोडा, दोष दुर्लक्ष करा सांगती  फक्त गुणांवर लक्ष असू द्या, बघता बघता नाती जुळती... नाती जपावी आणि टिकावी, मग दोषांचे क्षरण व्हावे नाती गुंफत जाता जाता, देश समाजहित रक्षण व्हावे.... या पृथ्वीवर नसे कुणीही, पूर्णपुरूष तो आजमितीला अपूर्णाकडून पूर्णत्वाच्या, वाटे चालू रोजमितीला.... चालताना आभाळ दिसू दे, क्षितिजाच्या त्या चरणापाशी नको संपवू प्रवास अपुला, पोचेस्तव तू क्षितिजापाशी....  पोचताच तू क्षितिजापाशी, पाय रोवूनी घट्ट उभा हो मग दिसता आभाळ ठेंगणे, हात लावुनी बघ त्याला हो.... ******************************************** शैलेश चौथाईवाले  ०३.१०.२०२४ आश्विन शुद्ध प्रतिपदा